आला पह्यला पाऊस (Ala Payhala Paus) – Bahinabai Chaudhari
‘अरे संसार संसार’ ही कविता बहिनाबाई चौधरी यांनी रचलेल्या कविते मधुल काही निवडक सर्वोत्कृष्ट कविते मधील एक आहे. प्रस्तुत कविता बहिणाबाईंच्या “बहिणाबाई चौधरी यांच्या कविता” या कविता संग्रहातून घेतली आहे. एक गरीब कुटुंब आयुष्याच्या वळणावर विविध सुख दुःखाचा सामना करतो आणि हसत खेळत तो पूर्ण करतो हे या कवितेतून कवीने मांडले आहे. जीवन म्हणजे काय असतं, आणि जीवन कसे जगावे हे या कवितेतून कवी सांगण्याचा प्रयत्न करतात.
कवी • (1912 - 1999)
- Share :
आला पह्यला पाऊस
आला पह्यला पाऊस
शिपडली भुई सारी
धरत्रीचा परमय
माझं मन गेलं भरी
आला पाऊस पाऊस
आतां सरीवर सरी
शेतं शिवारं भिजले
नदी नाले गेले भरी
आला पाऊस पाऊस
आतां धूमधडाख्यानं
घरं लागले गयाले
खारी गेली वाहीसन
आला पाऊस पाऊस
आला लल्करी ठोकत
पोरं निंघाले भिजत
दारीं चिल्लाया मारत
आला पाऊस पाऊस
गडगडाट करत
धडधड करे छाती
पोरं दडाले घरांत
आतां उगूं दे रे शेतं
आला पाऊस पाऊस
वर्हे येऊं दे रे रोपं
आतां फिटली हाऊस
येतां पाऊस पाऊस
पावसाची लागे झडी
आतां खा रे वडे भजे
घरांमधी बसा दडी
देवा, पाऊस पाऊस
तुझ्या डोयांतले आंस
दैवा, तुझा रे हारास
जीवा, तुझी रे मिरास !!!
Image by brgfx on Freepik
शब्दार्थ :
कर्दमलेले : भिजलेले कारभारणी : पत्नी गंगामाई (noun) : गंगा नदी / नदी
इतर कवी
नविन काव्य
-
शब्दांनीच पेटतात घरे, दारे, देश आणि माणसेसुदधा (Shabdanich petatat ghare dare desh ani manase suddha Poem) - वामन निंबाळकर
-
शब्द - शब्दांनीच पेटतात घरे, दारे, देश आणि माणसेसुदधा (Shabdanich petatat ghare dare desh ani manase suddha Poem) - वामन निंबाळकर
-
अरुण कोलटकर
-
नव्याने प्रकाशित झालेल्या मराठी कविता (Recently added marathi poems)
-
आजचे टॉप ट्रेंडिंग मराठी काव्य (Today's top trending Marathi poems)