शब्दांनीच पेटतात घरे, दारे, देश आणि माणसेसुदधा (Shabdanich petatat ghare dare marathi poem) – वामन निंबाळकर

वामन निंबाळकर यांची ही कविता शब्दांच्या उपयोगाचे जीवनावर होणारे परिणाम अधोरेखित करते. शब्द हे केवळ उच्चारले जात नाहीत, तर ते एखाद्याच्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करू शकतात. ही कविता शब्दांच्या शक्तीचा विचार करते – ते प्रेरणा देऊ शकतात, दुःख कमी करू शकतात, किंवा जखमा ठेऊ शकतात. शब्दांच्या जबाबदारीचा विचार करण्याचे महत्त्व कवितेत अधोरेखित केले आहे.

शब्दांनीच पेटतात घरे, दारे...

शब्दांनीच पेटतात घरे-दारे, देश 
आणि माणसेसुदधा
 
शब्द विझवतात आगही
शब्दांनी पेटलेल्या माणसाची
 
शब्द नसते तर?
 
शब्द नसते तर पडल्या नसत्या
डोळंयातून आगीच्या ठिणग्या
 
वाहिले नसते महापूर आसवांचे,
आले नसते जवळ कुणी,
गेले नसते दूर 
 
शब्द नसते तर!
शब्द नसते तर!

डोळंयातून आगीच्या ठिणग्या (श्लेष अलंकार): क्रोध

या कवितेचे मूळ लेखक

या ब्लॉगवर प्रकाशित झालेल्या कविता सोशल मीडिया, पुस्तके, वेब पोर्टल्स, प्रिंट मीडिया इत्यादी विविध स्रोतांमधून संग्रहित केल्या आहेत. या कवितांचे सर्व श्रेय त्यांच्या मूळ लेखकांना जाते. आम्ही लेखकाचे नाव आणि कवितेचा स्रोत यांसह योग्य माहितीसह संपूर्ण श्रेय प्रदान करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो.

या ब्लॉगवर प्रकाशित झालेल्या कोणत्याही कवितेचे तुम्ही मूळ लेखक असाल आणि तुम्हाला योग्य श्रेय दिलेले नाही असे वाटत असेल किंवा तुम्हाला ती काढून टाकायची असेल, तर कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधा. सर्व कवींच्या हक्कांचा आणि योगदानाचा आदर करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

वाचकांना कवितेचे मूळ स्त्रोत शोधण्यासाठी आणि कवितेबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

मराठी कवितेचे वैविध्यपूर्ण जग समजून घेतल्याबद्दल आणि त्याचे कौतुक केल्याबद्दल धन्यवाद.

Scroll to Top